मिशेल नावाचा ‘चॉपर’

गेल्या मार्चमधील ही बातमी. गोव्याच्या किनारपट्टीपासून आत समुद्रात एका छोट्याशा बोटीवर अडकलेल्या एक महिलेची तटरक्षक दलाच्या बोटींनी सुटका केली. ती होती संयुक्त अरिब अमिरातीतली. तिला इकडे ताब्यात घेण्यात आले आणि परत दुबईला पाठवून देण्यात आले. अनेक मराठी वृत्तपत्रांनी तर या बातमीची दखलही घेतली नव्हती. वरवर पाहता त्यात दखल घ्यावे असे काही नव्हतेही. एक गोष्ट महत्त्वाची होती त्यात. ती म्हणजे ती महिला तेथील राजघराण्यातील होती. पण दुर्लक्षलीच गेली ती बातमी. 
त्यानंतरची एक बातमी. मे महिन्यातली. अनेक वृत्तपत्रांच्या देशविदेश पानावर कुठेतरी कोप-यात लागलेली, की - ऑगस्ता वेस्टलॅंड हेलिकॉप्टर दलाली प्रकरणातील एक आरोपी ख्रिस्तियन मिशेल जेम्स याच्या विरोधात संयुक्त अरब अमिरातीच्या न्यायालयात पुरेसे पुरावे सादर करण्यात भारतास अपयश. मायकेलला भारतात आणण्याच्या प्रयत्नांना खीळ. आपल्या दैनंदिन विचारविश्वात अशा प्रकारच्या बातम्यांना स्थान असतेच कुठे?दिल्लीतील राजकीय वर्तुळात तिने काही खळबळ माजवली असेल, च्यानेली चर्चांत ती कुठे झळकळी असेल, तेवढेच.
आता अशा बातम्यांची ही गत. तर मग गेल्या आठवड्यात अर्जेंटिनातील जी-२० शिखर परिषदेत झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी राजे मोहम्मद बिन सलमान यांच्या भेटीचे ते काय कौतुक?सौदी पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्येत या राजेसाहेबांचा हात असल्याचा संशय जगभरात घेतला जातो. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका सुरु आहे. अशा व्यक्तीची आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भेट घेतली म्हणून काहींनी मोदींवर टीका केली. पण आपणही अशा नैतिक वगैरे बाबींना फारसे गांभीर्याने घेत नाही. आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीच्या प्रांतात असे चालतेच असे समजून आपण त्याकडे काणाडोळाच करतो. 
त्यामुळे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त अरब अमिरातीचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला बिन झाएद अल नाहयान यांच्याशी ख्रिस्तियन मिशेलच्या प्रत्यार्पणाबाबत चर्चा केल्याची बातमीही आपल्याही नजरेआडच राहिली. हे सारे स्वाभाविकच आहे. 
या सा-या सुट्यासुट्या घटना. त्यांचे सर्व बिंदू एकत्र जोडले, की मग मात्र आपल्यासमोर एक मोठे चित्र उभे राहते.

अजित डोभाल : भारताचे ‘जेम्स बॉण्ड’... ‘द सुपरस्पाय’ इ.इ.

गुप्तचरांच्या कारवाया या नेहमीच गूढ, छुप्या आणि म्हणून सहसा पुराव्याने शाबीत न होणा-या असतात. त्यामुळे त्यांच्याविषयीची मिथके तयार करणे सोपे असते, हेच यातून स्पष्ट होते.

आणि आज भारतात त्यापद्धतीने डोभाल मिथक तयार झालेच आहे. त्यामुळेच या माणसाला पाहून पाकिस्तान चळाचळा कापतो असे चित्रवाणी वाहिन्यांतील स्टुडिओ-राष्ट्रवादी म्हणतात आणि त्यावर सर्वजण डोळे झाकून माना डोलावतात.

परंतु याचा अर्थ असाही नाही, की सर्वच डोभालचरित्र ‘फेक’आहे. तशी शंकाही घेणे हा या आयबी गुप्तचरावरील अन्याय ठरेल. त्यांच्या शौर्याचा, बलिदानाचा तो अपमान ठरेल. पण हेही तेवढेच खरे, की सारेच डोभालचरित्र खरे मानणे आणि ते ‘जेम्स बॉण्ड’होते या कारणाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून त्यांची सर्व धोरणे डोक्यावर घेऊन नाचावीत अशीच आहेत असे मानणे हेही अयोग्य ठरेल.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोभाल आणि आयबी अधिकारी डोभाल यांच्यात गल्लत करता कामा नये.

(पूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा)

दोन हेरांच्या गप्पा... दोन देशांचे प्रश्न!

दोन गुप्तचर अधिकारी. एक रॉचे माजी प्रमुख. दुसरे आयएसआयचे माजी प्रमुख. या दोन्ही संस्था एकमेकांना शत्रूस्थानी. एकमेकांविरोधात कटकारस्थाने करणा-या. यातील आयएसआय – इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स – ही पाकिस्तानी लष्कराची अत्यंत शक्तिशाली अशी संस्था. भारतातील अनेक दहशतवादी हल्ल्यांनी हात रंगलेली. तिचे नाव काढताच कोणत्याही भारतीयाच्या कपाळाची शीर तडकावी. हेच पाकिस्तानात रॉबाबत. ही कॅबिनेट सचिवालयांतर्गत येणारी हेरसंस्था. रिसर्च अँड अनालिसिस विंग – संशोधन आणि विश्लेषण विभाग. नाव किती साधे!पण आपल्यासाठी आयएसआय जेवढी खतरनाक त्याहून पाकिस्तानी नागरिकांसाठी ही संस्था अधिक भयंकर आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक समस्येमागे त्यांना रॉ दिसते. तेथील अनेकांची तर अशीही श्रद्धा आहे, की पाकिस्तानी तालिबानमागेही रॉचाच हात आहे. तर अशा या संस्थांचे माजी प्रमुख एकत्र येतात. वेगवेगळ्या देशांत, शहरांत, तेथील हॉटेलांत मद्याचे घोट घेत, सिगारची धुम्रवलये काढत गप्पा मारतात. हे म्हणजे आक्रीतच. पण ते घडले आणि त्यातून जन्माला आले द स्पाय क्रॉनिकल्स

पाकिस्तानी पाखंड

आंतरराष्ट्रीय राजकारणात मानवतावाद या शब्दाच्या आड अनेकदा प्रच्छन्न स्वार्थक्रौर्य आणि फसवणूक या गोष्टीच दडलेल्या असतात याची प्रचीती पाकिस्तानने पुन्हा एकदा आणून दिली. यावेळी त्याला निमित्त ठरले ते कुलभूषण जाधव प्रकरण. सध्या पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या जाधव यांना भेटण्यास त्यांच्या आई आणि पत्नीस परवानगी देऊन आपण फार मोठे मानवतावादी कृत्य करीत आहोतइस्लामी संस्कृतीला अनुसरून आपण काही तरी पुण्यकर्म करीत आहोतअसा आव पाकिस्तानने आणला असला तरी ते सारेच किती फसवे आणि स्वार्थप्रेरित होते हे ती भेट ज्या पद्धतीने घडवून आणण्यात आली त्यातून दिसून आले. हे सारेच अत्यंत संतापजनक आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनातूनही हाच संताप मुखर होत आहे. भेटीचा तो संपूर्ण प्रकारच अविश्वासार्ह’ होता अशा कडक शब्दांतून भारतीय परराष्ट्र खात्याने भारतीय नागरिकांचीच भावना व्यक्त केली आहे. अखेरीस कोणत्याही दोन देशांतील नात्यांमध्ये मानवी संबंध आणि भावना यांना महत्त्व असतेच. कुलभूषण प्रकरणातून पाकिस्तानने कोट्यवधी भारतीयांच्या भावनांचाही विचार करणे आवश्यक होते. तसे न करता त्याचा केवळ प्रोपगंडा या हेतूने वापर करण्यात आला. हे सर्व केल्यानंतर त्या दुखावलेल्या भारतीय भावनांचा परिणाम भारत-पाक संबंधांवर होणार नाही असे पाकिस्तानी मुत्सद्द्यांना वाटत असेल, तर ते मूर्खांच्याच नंदनवनात राहात आहेत असे म्हणावे लागेल.

काळोखातल्या झुंजारकथा


जानेवारी १९७१. 
अजून बांगलादेश युद्धाला तोंड फुटायचे होते. वातावरणात जबरदस्त तणाव होता. अशा काळात ती संपूर्ण देशास हादरवून टाकणारी घटना घडली. 
दोन काश्मिरी दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या गंगा या विमानाचे अपहरण केले. श्रीनगरहून जम्मूकडे निघालेले हे विमान. दहशतवाद्यांनी एक पिस्तुल आणि हातबॉम्ब यांचे भय दाखवून पळवले. लाहोरला नेले. चार कर्मचारी आणि २६ प्रवाशांना ओलीस ठेवले. 
हा आयएसआयचा मोठाच विजय होता. कारण जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचे हे दहशतवादी वस्तुतः आयएसआयचेच एजंट होते. त्यातल्या एकाचे नाव हाशीम कुरेशी. त्याला आयएसआयनेच प्रशिक्षित केले होते. अश्रफ कुरेशी या चुलतभावाला सोबत घेऊन त्याने ही कामगिरी केली होती. त्यांची मागणी होती अल-फतह संघटनेच्या ३६ दहशतवाद्यांची सुटका करण्याची. पण अशा धमक्यांपुढे भारत कदापि झुकणार नाहीअसे इंदिरा गांधी यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे परिस्थिती बिकट बनली होती.  
तिकडे पाकिस्तानात मात्र आनंदोत्सव सुरू होता. जे कंदहार विमान अपहरणाच्या वेळी झालेतसेच तेव्हाही झाले होते. हाशीम कुरेशीला स्वातंत्र्यसैनिक म्हणून डोक्यावर घेतले जात होते. लाहोर विमानतळावर कोणत्याही आडकाठीशिवाय त्याला फिरू दिले जात होते. तो पत्रकारांना मुलाखती देत होता. दुस-या दिवशी त्याने पाकिस्तानकडे एक मागणी केली. झुल्फिकार अली भुट्टो यांना भेटण्याची. पाकिस्तानी नेते वरवर या घटनेचा निषेध करीत असताना भुट्टो मात्र त्याच्या मागे उभे राहिले होते. ते अगदी विमानाजवळ जाऊन त्याला भेटले. 
त्यानंतर हाशीमने अचानक सर्व प्रवाशांची सुटका केली. पण अपहरणनाट्य संपले असे वाटत असतानाच अचानक त्या विमानाला आग लागली. ती आयएसआयने लावली की हाशीमने बॉम्बस्फोट करून ते उडवले हे काही समजले नाही. पण काहीही झाले तरी आयएसआयने भारताचे नाक कापले होते. 
चिडलेल्या भारतीय राज्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर ही घटना नेली. पाकिस्तान कसा दहशतवाद्यांना मदत करतो ते दाखवून दिले. आता पाकिस्तानवर काही तरी कारवाई करणे आवश्यकच होते. अखेर इंदिरा गांधी यांन नाईलाजाने एक आदेश दिला. पाकिस्तानी विमानांना भारतीय हद्दीतून प्रवेश करण्यास त्यांनी बंदी घातली. 
त्या काळातील वृत्तपत्रे पाहिली तर लक्षात येईलकी या प्रकरणावरून तेव्हाही सामान्य जनतेने सरकारवर टीका केली होती. नेहमीप्रमाणे शेपटीघालू धोरणच हे. भारताचे हे दुबळेपण पाहून सच्च्या देशभक्तांचे रक्त सळसळणारच. नेहरू-गांधी घराण्याच्या शांततावादी धोरणामुळेच पाकिस्तान असे धाडस करू शकते असे कोणालाही वाटणारच. पण...
आंतरराष्ट्रीय राजकारणात जे दिसते ते तसेच असते असे नसते. यात भारताचे नाक वगैरे काहीही कापले गेले नव्हते. तर हे गंगा अपहरण प्रकरण म्हणजे भारताचा मोठा विजय होता. रॉच्या शीरपेचातील एक लखलखता तुरा होता. कारण – या सगळ्या अपहरणनाट्याचा सूत्रधार होती रॉ आणि दिग्दर्शक होते आर. एन. काव.

रॉ आणि पाकिस्तानपठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानचे संयुक्त तपास पथक भारतात येण्याच्या मुहूर्तावर पाकिस्तानने कुलभूषण जाधव हेरगिरी प्रकरण जाहीर करावे येथूनच या प्रकरणाच्या खरेपणाबाबतच्या संशयाला सुरूवात होते. भारत आणि पाकिस्तानातील संबंध जरा कुठे सुरळीत होत आहेत अशी शंका येताच भारतात मोठा दहशतवादी हल्ला होतो. यावेळी पाकिस्तानी लष्कराने जरा वेगळा मार्ग स्वीकारला आहे. यावेळी भारताच्या हेरगिरीचे प्रकरण पुढे आणले आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार कुलभूषण जाधव ऊर्फ हुसेन मुबारक पटेल हे रिसर्च अँड अनालिसिस विंग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेचे हेर आहेत. अलीकडेच पाकने त्यांच्या कबुलीजबाबाची ध्वनिचित्रफीत प्रसिद्ध केली. त्यात त्यांनी आपण नौदल अधिकारी असून, रॉसाठी इराणमधून पाकिस्तानविरोधात दहशतवादी कारवाया करीत असल्याची कबुलीदिली आहे. मात्र ती बनावट असल्याचे भारतीय परराष्ट्र खात्याचे म्हणणे आहे. 
ती ऐकल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होते, की त्यात अनेक विसंगती आहेत.

जाधव यांना परत आणा

(लोकसत्ता - अन्वयार्थ)
कुलभूषण जाधव हे नौदलातील निवृत्त कमांडर आहेत. ते एक व्यावसायिक आहेत. निदान तसे सांगितले जाते. ते रिसर्च अँड अनालिसिस विंग (रॉ)चे गुप्तचर आहेत की काय याबद्दल मात्र संभ्रम आहे. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार ते अजूनही नौदलात असून, रॉसाठी हेरगिरी करीत होते. या आरोपाखाली त्यांना पाकिस्तानी पोलिसांनी बलुचिस्तानातून अटक केली. बलुचिस्तान आणि कराचीतील पाकविरोधी कारवायांमध्ये आपला हात असल्याचे त्यांनी कबूल केल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाने म्हटले आहे. भारतीय परराष्ट्र खात्याने त्याचा साफ इन्कार केला आहे. भारताच्या म्हणण्यानुसार त्यांनी मुदतीपूर्वीच नौदलातून निवृत्ती घेतली असून त्यांचा रॉशी संबंध नाही. यातील खरे-खोटे कदाचित कधीच उजेडात येणार नाही. अशा प्रकरणांत सत्यालाही अनेक चेहरे असू शकतात. बलुचिस्तानात भारताचे हेर पाकविरोधी कारवाया करीत असल्याचे पाकिस्तानी माध्यमांचे म्हणणे आहे. तेथे स्वातंत्र्यवादी चळवळी सुरू आहेत. त्यांना भारतातून खतपाणी घातले जात असणार यात शंका नाही. रॉचा इतिहास अशा शंका घेण्यास परवानगी देत नाही. परंतु अशा गोष्टी कोणताही देश जाहीरपणे मान्य करीत नसतो. अखंड पाकिस्तान हा उपखंडातील स्थैर्यासाठी आवश्यक असल्याचे भारताने नेहमीच म्हटले आहे. हे भारताचे परराष्ट्र धोरण झाले. ते गुप्तचर संस्थांच्या धोरणाशी मेळ खाणारेच असते असे म्हणणे हा बावळटपणा झाला.

रॉ मटेरियल - पडद्यामागचे राजकारण समजावून घेण्यासाठी

राजकारण हा जगातील एक असा विषय आहे, की त्यात सगळेच तज्ञ असतात. तशात ते राजकीय बातमीदार असतील, तर विषयच संपला! राजकीय नेत्यांशी जवळीक आणि त्यांच्याकडून मिळणारे गॉसिपचे तुकडे एवढ्या आधारावर त्यांची तज्ञता फळते, फुलते. लिहिण्याची झोकदार शैली असली, की ही तज्ञता पाजळताही येते. वाईट असे, की पुढे त्यांना स्वतःलाही वाटू लागते, की आपल्याला राजकारणाच्या गूढगर्भातलेही सारे काही कळते. द कावबॉईज ऑफ रॉसारखी पुस्तके वाचली की मग लक्षात येते, की राजकारण इतके सोपे नसते. एकपदरी नसते. त्याला अनेक पापुद्रे असतात. 
प्रत्येक राजकीय घडामोडींमागे एकाचवेळी विविध समान आणि विरोधी बले कार्यरत असतात. भिन्न प्रतलांवरून ते चालत असते. द कावबॉईज ऑफ रॉसारखी पुस्तके हे भान देतात, की उदाहरणार्थ - गॅट करारातून अवतरलेले जागतिकीकरण, सगळ्याच माध्यमांचे आवृत्तीकरण, कुटुंबव्यवस्थेचे व्यक्तिकेंद्रीकरण, मोठ्या प्रमाणावर निमशहरांची निर्मिती, आंतरराष्ट्रीय व्यापार असा एक गुंता असतो. आपणांस तो दिसत नाही. दिसते ते आघाड्यांचे राजकारण. ते ऐंशीच्या दशकात फारसे यशस्वी झालेले नसते. आता मात्र त्याला पर्याय नसतो. आणि हे का हे काही आपल्याला कळत नसते. आपण याची उत्तरे कुणाच्या करिष्म्यात, कुणाच्या राग-लोभ-द्वेषात, महत्वाकांक्षांत शोधत असतो. किंवा उदाहरणार्थ वाढलेल्या दहशतवादाची उत्तरे केवळ धार्मिक तत्वज्ञानात शोधत असतो. किंवा भारत-पाकिस्तानातील शत्रूत्त्वाचा आंतरराष्ट्रीय कंगोरा आपल्या नजरेसमोरच नसतो. आपली अवस्था हत्तीच्या कथेतल्या आंधळ्यांसारखी असते. 
अर्थात राजकारणाचे हे पदर उलगडून दाखविणे हा काही कावबॉईज ऑफ रॉचा हेतू नाही. हा राजकारणावरचा सटीप प्रबंध नाही. रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (आर अँड एडब्ल्यू - रॉ) ही भारतीय गुप्तचर यंत्रणा.

रॉ फाइल


आपल्याकडच्या प्रत्येक दहशतवादी कारवाईमागे इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स (आयएसआय) या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेचा हात असतोअसे म्हणण्याची पद्धत आहे. तशीच रीत पाकिस्तानातही आहे. तेथील प्रत्येक दहशतवादी हल्ल्यामागे रिसर्च अँड अँनालिसिस विंग (रॉ)चा हात आहेअसे म्हटले जाते. तीन वर्षांमागे लाहोरमध्ये अहमदींवर भीषण हल्ला झाला होता. ८० लोक त्यात मारले गेले होते. तर पाकिस्तानमधील द नेशन या इंग्रजी दैनिकात पहिल्या पानावर ती हल्ल्याची बातमी होती आणि शेवटच्या पानावर पाकिस्तानात ३५ हजार रॉ एजंट कार्यरत अशा ठळक मथळ्याची सविस्तर बातमी होती. रॉच्या बाबतीत तिथे हे असे नेहमीच म्हटले जाते. कारण ते सोयीचे असते. कदाचित ते खरेही असेलपण त्याबद्दल कोण खात्रीपूर्वक सांगणार?

तर अशी ही रॉ. भारताची विदेशात हेरगिरी करणारी संस्था. १९६८ मध्ये तिची स्थापना झाली. भारतीय सुपरस्पाय म्हणून ओळखले जाणारे रामनाथ काव हे तिचे पहिले संचालक. या गुप्तचर संस्थेच्या नावावर आजवर अनेक उत्तम कामगि-यांची नोंद आहे. बांगलादेशची मुक्तीसिक्कीमचे सामिलीकरणसियाचेनवरील भारताचा ताबा ही त्यातली काही मोजकी उदाहरणं. एलटीटीईच्या अतिरेक्यांना प्रशिक्षणम्यानमारमधील कचिन इंडिपेन्डन्स आर्मीला मदत आणि नंतर त्या बंडखोर संघटनेचे काही नेते हाताबाहेर गेल्यानंतर त्यांच्या हत्या अशाही काही कामगि-या रॉच्या नावावर आहेत. पण सगळेच काही असे छान छान नाही. रॉ अनेक मोहिमांत तोंडावर आपटलेली आहे. अनेकदा रॉच्या एजंटांनी तिच्या तोंडाला काजळी फासलेली आहे. उदाहरणार्थ मेजर रबिंदर सिंग.

हेरस्य कथा रम्यः

१३ मार्च १९५४ हा केजीबीचा जन्मदिवस. ६ नोव्हेंबर १९९१ हा "मृत्युदिन'. १९९१ च्या ऑगस्टमध्ये मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याविरोधात झालेल्या बंडामध्ये केजीबीचे अध्यक्ष कर्नल व्लादिमिर क्रुश्‍कोव्ह यांनी सहभाग घेतला होता. त्याची शिक्षा म्हणून ही संघटनाच बरखास्त करण्यात आली. आज केजीबीचीच पडछाया असलेली "एफएसबीही संघटना रशियात कार्यरत आहे. 

केजीबीच्या बोलीमध्ये "अॅक्‍टिव्ह मेझर्सहा शब्द खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याचा अर्थ सोव्हिएत रशियाच्या परराष्ट्र धोरणातील उद्दिष्टांची पूर्ती आणि जगभरात सोव्हिएत प्रभाव निर्माण करणे याकरिता केल्या जाणाऱ्या कारवाया. त्यात विदेशी प्रसारमाध्यमांना बनावट कागदपत्रं पुरवून अर्धसत्य वा चुकीची माहिती पुरवून गोंधळ निर्माण करणेसोव्हिएत रशियाचा राजकीय प्रभाव वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांमध्ये "बेनामीसंघटना स्थापन करणेदहशतवादी,बंडखोर संघटनांना मदत करणे इत्यादी कृत्यांचा समावेश होतो. पुन्हा अशा कारवाया केवळ शत्रूराष्ट्रातच करायच्या असं काही बंधन नसतं. त्या भारतासारख्या मित्रदेशामध्येही केल्या जात. "मित्रोखिन अर्काइव्ह'ने ते पुरेसं स्पष्ट केलं आहे.

व्हॅसिली मित्रोखिन यांची कथा सुरू होते ती साठच्या दशकात.